जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार टिकाराम कोंगरे यांचा डंका….
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची टिकाराम कोंगरे यांची बाजी
वणी ( 22.डिसें.) :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी सोमवारी रोजी जिल्ह्यातील 29 केंद्रावर मतदान झाले. 19 जागांसाठी भाजप समर्थीत शेतकरी सहकार विकास आघाडी व महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती.
वणी तालुका गटात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली असुन वणी येथे महाविकास आघाडी पॅनलचे टिकाराम कोंगरे विजयी झाले आहे.
वणी येथे 68 मतदार होते. यात टिकाराम कोंगरे यांना 42 मते मिळाली तर विनायकराव एकरे यांना 25 मते मिळाली तर , एक मत बाद झाले.
यामध्ये महाविकास आघाडीच्या टिकाराम कोंगरे यांचा दणक्यात विजय झाला.



