राजुर येथील महिलांनी वेकोलिच्या भोंगड कारभाराबाबत निवेदनातून पालकमंत्री व खासदारांना घातले साकड़े —
– मागील 2 महिन्यापासून पथदिवे लावण्यासाठी तक्रार देवूनही येथील अधिकारी देत आहे उड़वाउडविचे उत्तरे
वणी 20 डिसें :- आज दिनांक 20.12.2020 ला राजुर येथील महिलांनी वरिष्ट प्रबंधक विद्युत व यांत्रिकी वणी नार्थ राजुर येथे निवेदन दिले . राजुर रस्त्यावर असनारे पथदिवेबद्दल वारंवार तक्रार व निवेदन देवूनही त्यावर आतापर्यंत येथील विद्युत व यांत्रिकी अधिकारी मागील 2 महिन्यापासून नागरिकांची दिशाभूल करीत आहे .तरीही आज सर्व नागरिक राजुर येथील wcl आफिसला जाऊंन निवेदन हे डिस्पैच केले .
कारण इथे विद्युत व यांत्रिकी वरिष्ठ प्रबंधक विजय शर्माला कॉल केला असता त्यानी त्या सर्व महिलाना “मि अवघ्या 10 मिनिटात येतो अशी फोनवर ग्वाही ही दिली परंतु 2 ते 3 तास महिला तिथे उभे राहिल्या व शेवटी ते निवेदन डिस्पैच मधे दिले .हा अधिकारी मागील 2 महिन्यापूर्वीच अश्याच प्रकारे उड़वाउडविचे उत्तरदेता- देता 2 महीने उलटून गेले . पण निकाल मात्र लागला नाही .ह्या भागात पथदिवे अर्धे बन्द व अर्धे सुरु अवस्थेत आहे,
म्हणून रस्त्यात कधीही घातपात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली दिसून येत आहे. सकाळी व रात्रीच्या वेळेला पथदिवेमुळे नागरीकांना रहदारी साठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मात्र राजुर कॉ येथील वेकोलीच्या या अधिकारीच्या दुर्लक्षितपणा बेजबाबदारी पणामुळे नागरिकांना जीव धोक्यात टाकून अनेक रात्रीचा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मात्र मागील 2 महिन्या पासून सांगूनही येथील अधिकारी ऐकत नाही आहे . ह्या राजुर वेकोलीतील अधिकारीवर्ग ऐकत नाही असा स्पष्ट आरोप नागरिक व महिला करत आहे. 2 महीने उलटूनही आताही यश आले नाही.
याचा मागील कारण नेमके क़ाय ? नेमके कोण अडथळा टाकत आहे? असा सवाल नागरिक विचारण्यास गेले असता तो अधिकारी चर्चा करण्यासाठी आला नाही उलट महिलांना त्यानी नाहक तिथे उभे ठेवले .ह्या मार्गावर सर्व मोठ्या प्रकारचे वाहने चालतात व wcl चे कर्मचारी तसेच अधिकारीवर्ग सुद्धा ह्याच मार्गाने रहदारी करीत असतात .तरीही येथील अधिकारी मात्र त्या पथदिवे कड़े कोणीही लक्ष देत नाही आहे.
हे सर्व राजुर wcl येथील अधिकारी एखाद्या अपघात होण्याची वेळ बघत आहे का ? असा प्रश्न येथील नागरिक करीत आहे.आता तरी वरिष्ठ प्रबंधक विद्युत व यांत्रिक जागे होतील की काय ? असे गावातील नागरिकांमध्ये सद्या चर्चा जोरात सुरू आहे.
गावात रस्त्यात पथदिवे चालू अवस्थेत असले तरीही अर्धे बन्द व अर्धे सुरु आहे.महत्वाचे म्हणजे चेक पोस्ट वर सुद्धा पथदिवे बंद आहे . येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.राजुर ह्या गावची मिनी इंडिया म्हणून ओळख आहे, मात्र याच गावात येणाऱ्या रस्त्यातिल पथदिवेची दुरवस्था पाहुन अधिकारी कसे निद्रा अवस्थेत असु शकता ???? हा प्रश्न चिन्ह निर्माण होते. सद्या स्थितीत रहदारीत मोठे बिकट स्थिति आहे. आता फक्त आश्वासन नको ,वरिष्ठ प्रबन्धक विद्युत व यांत्रिकी अधिकारीला स्पष्ट शब्दात सांगितले आहे .लवकरात लवकर 50 लाइट लागले पाहिजे असे गावकरी मागणी करीत आहे .गावातील त्याच रस्त्यावरून भांडेवाड़ा माइन कडे जाणाऱ्या सर्व पथदिवे उद्ध्वस्त झाली आहे. हे पाहुन प्रशासनाचे लक्ष नेमके कुठे आहे ? हे दिसून स्पष्ट दिसून येते
.
प्रशासनाचा भोंगड कार्याने गावात असमाधानकारक चित्र निर्माण झाले असले तरी,येथील इलेक्ट्रिक विभागातील यंत्रणेच्या कामांचा दर्जाही चव्हाट्यावर आला आहे. ठिकठिकाणी अंधारात वाट शोधताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
रस्त्यांवरून चाललेली वाहने असे स्वप्न राजुरवासियांना रोजच पडत आहे. परंतु, तूर्तास तरी नागरिकांना चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच वाहने दामटावी लागत असून, त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. अंधारच अंधार चोहीकडे अशी सध्या राजुर कॉ येथील बहुतांश रस्त्यांची स्थिती असून, पथदिवे तत्काळ लावावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली ह्या रस्त्यावर रात्रि एखादी घटना झाली तर ,येथील इलेक्ट्रिक विभागातील अधिकारी जबाबदार राहणार .राजुर WCL येथील मोठ्या अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घ्यावी. अन्यथा मोठी घटना घडेल की क़ाय येणारी वेळ सांगेल.
म्हणून येत्या 10 दिवसात पथदिवे लागणार नाही तर , गावातील महीलांकड़ूँन तीव्र स्वरूपाचे आंदोलन राजुर येथील अधिकारी विरुद्ध व प्रशासना विरुद्ध छेडन्यात येईल ,असा निवेदनात स्पष्ट गावकरी सांगत आहे.
डिस्पैचला निवेदन देताना समय्या कोंकटवार,आशा रामटेके दुर्गा एलगुलवार,अश्विनी एलगुलवार,व्यंकटी मुक्का,श्रीजोत ,विनोद तांनरा,अब्राहम कलवलवार,वर्षा धुर्वे,माहेश्वरी गिरडवार,अश्विनी ताई,विजया एलगुलवार,सीनू गड्डमवार,सुरेश अन्ना,विनोद भाऊ हे सर्व उपस्थित होते.
.



