राजुर येथील उच्चशिक्षित मोजेस एलपुलवार शोलोमन सर यांचा मोठ्या बंधुचे दीर्घ आजाराने दुःखद निधन

*निधन वार्ता*
वणी- तालुक्यातील राजुर कॉ येथे काल दि 19 डिसें. पहाटे 5 वाजताच्या दरम्यान राजुर गावातील शोलेमन सर् एलपुलवार यांचे मोठे भाऊ गावातील उच्च सुशिक्षित व्यक्ति तसेच फ्री मेथोडिस्ट चर्च राजुरचे कर्तबग़ार व्यक्ति म्हणून परिचित असणारे मोजेस एलपुलवार यांचे मुंबई येथील दवाखान्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
दुःखद निधनाने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे .प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे . एक वेगळी व्यक्तिमत्व व मित्रांना आपल्या हासत्या भाषेत मंत्रमुग्द करणारा तसेच ,गावातील एक उत्तम स्वभावाचा व्यक्ति निघुन गेल्यामुळे त्यांचा परिवारात व गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे.
त्यांचे पार्थिव शरीर त्यांचा राहत्या घरी राजुर येथे ठेवण्यात आले आहे. राजुर येथील मोक्षधामात अंत्यविधि आज दिनांक 20.12.2020 ला सुमारे 11.30 च्या दरम्यान करण्यात येईल.
मोजेस एलपुलवार यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे.त्याच्या मागे एक मुलगी दोन भाऊ, आई असा आप्त परिवार आहे.
.