महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा कार्यकारीणी सभा

उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या प्रत्येक अडचणीत संघटना पाठीशी आहे. :– अशोक चौधरी ( राज्य उपाध्यक्ष:- ग्रेट मुख्याध्यापक संघटना)
वणी (19.डिसें.):- ग्रेड मुख्याध्यापक तालुका सदस्य कार्यकारिणीची सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा (वणी , यवतमाळ, महागाव, उमरखेड, पुसद) या पाच तालुक्याच्या मुख्याध्यापक बांधव यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आलेली आहे.त्या सभेत महासंघाचे ध्येय धोरण, मुख्याध्यापक यांच्या तालुका, जिल्हा, राज्य पातळी वरील समस्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे तसेच या पाचही तालुक्याच्या ठीकाणी अध्यक्ष, सरचिटणीस यांची निवड करून, नियुक्ति पत्र प्रदान करण्याचा कायॅक्रम आयोजन करण्यात आले आहे.
या सभे करीता यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष अशोक चौधरी, सरचिटणीस सचिन सानप, कार्याध्यक्ष अरविंद गांगुलवार, उपाध्यक्ष राजेश निरे,सल्लागार अनंतराव चौधरी, कोषाध्यक्ष प्रल्हाद होरे मार्गदर्शन करणार आहे.
तरी नजीकच्या तालुक्यातील बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे . असे आवाहन राज्य ग्रेट मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.