राजूरच्या वेकोलीला विदर्भ 24 न्यूजच्या बातमीचा दणका -रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे कार्य सुरू
वणी (19 डिसें ) :-तालुक्यातील राजुर गावातील राजुर फाटा पासून गावात जाणाऱ्या सर्व रस्त्यावर खड्डे पडले होते रस्त्यात अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
गावातील नागरिकांना तसेच येथील अधिकारीवर्ग, कामगार वर्गांना ये -जा करण्यात त्रास सहन करावा लागत होता
.
वारंवार तक्रार निवेदन देऊन येथील प्रशासनाला जाग येत नव्हते.शेवटी विदर्भ न्यूज-24 च्या बातम्याच्या प्रसारितेने राजूर येथील W.C.L चे अधिकारी व पदाधिकारी अखेर जागे झाले.
जवळपास 5 लाखापर्यंतचे ( road patch-up) खड्डे दुरुस्तीचे कार्याची टेंडर नोटीस काढावी लागली व राजुर रोडच्या कामाची सुरुवात झाली.
दिनांक 17. 2. 2020 पासून कामाची सुरुवात केली आहे.राजूर फाटापासून ते Wcl कार्यालयापर्यंत हा रोड बनविण्यात येणार आहे.
विदर्भ 24 न्यूज़चा बातम्या वारंवार पाठलाग केल्यामुळे अखेर राजुर रोडचा कामाला सुरुवात झाली व काही प्रमाणात गावातील नागरिकांना दिलासा मिळाला . सरते शेवटी ग्रामस्थांनी विदर्भ24 न्यूजचे आभार मानले.