चिंतलधाबा जवळ कार दुचाकीमध्ये अपघात, तिन युवक गंभीर जखमी
पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील साईकृपा विद्यालय जवळ आज दुपारी 3:30- 4:00 च्या सुमारास कार आणि दुचाकीला जबरदस्त अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेल्या कालीदास सुखदेव ऊईके (२५) अनिल सुखदेव ऊईके (२८) व पियूष पुरुषोत्तम ऊईके (१४) या तिघांच्या पायाला जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच चिंतलधाबा गावातील गावकर्यांनी पोलिस स्टेशन पोंभूर्णा येथे माहीती देऊन अंबूलन्स ला पाचारण करण्यात आले. व त्यांना प्रथम उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जखमी युवक चिंतलधाबा येथील रहिवासी आहेत.पुढील तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहे.



