गडचिरोली-चामोर्शी मार्गाचे निकृष्ट बांधकामाची तात्काळ चौकशी करा निवेदनातून मागणी
-बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करा-दिपक बोलीवार, मा. ग्रा.पं.सदस्य डोंगरगाव तथा BRSP तालुकाध्यक्ष गडचिरोली,
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
डोंगरगाव :- गडचिरोली ते चामोर्शी रस्त्याचे बांधकाम सुरू असून, मौजा डोंगरगाव जवळ सुरु असलेल्या बांधकामात सुरवातीला गावात जाणाऱ्या मार्गावर मोठी नालीचे बांधकाम केल्याने गावातील नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे, रोड च्या बांधकामात खोदकाम केल्यानन्तर गीटी, रेती वापरकरून त्यानंतर मुरूम वापरायला पाहिजे त्या ठिकाणी नुसतीच मातीचा वापर करून त्या रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केल्या जात असल्यामुळे.सदर रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट व खराब साहित्य वापरून बांधकाम केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे रस्ता बांधकामाच्या सुरवातीला बांधकाम करत असताना यामध्ये निकृष्टपणा व भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे. सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करून बांधकाम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधित महामार्गाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई केली नाही तर संबंधित मार्गाचे काम बंद करून आंदोलन करणार असे दिपक बोलीवार, मा. ग्रा.पं.सदस्य डोंगरगाव तथा BRSP तालुकाध्यक्ष गडचिरोली, यांनी मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदनातून मागणी केली आहे.




