वाघाच्या हल्ल्यात महिला ठार..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : चांदाळा मार्गावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर अचानक वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवार १६ डिसेंबर रोजी दुपारी ०१.३० वाजताच्या सुमारास घडली असून, महिला नामे सुधा अशोक चिलमवार रा. इंदिरानगर ( ५८ ) असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे . प्राप्त माहितीनुसार गडचिरोली उपवनक्षेत्रातील चांदाळा येथे सुधा चिलमवार व इतर ५ ते ६ स्त्रियांसह सरपण गोळा करण्याकरिता गेल्या असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला व काही अंतरापर्यंत ओढत नेले यात सुधा चिलमवार यांचा मृत्यू झाला. वाघाने हमला केला असता इतर महिला ह्या घटनास्थळावरून पळ काढत घटनेची माहिती वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी डी.व्ही . कैलुके , क्षेत्रसहायक पी.ए. जेनेकर , गुरवळाचे क्षेत्रसहायक अरूण कन्नमवार व अधिनस्त वनाधिकारी , कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाउन पाहणी केली तसेच पोलीस निरीक्षक मेश्राम व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या उपस्थितित मौका पंचनामा करून मृत महिले चे शव जिल्हा रूग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले.घटनेचा अधिक तपास उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी , सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी डी.व्ही . कैलुके करीत आहे.




