ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार तरुण युवकाने केली चक्क वेळेची मागणी
-अजब मागणी-मला पैसा नको वेळ वापीस करा
मुख्यमंत्री महा. राज्य व मुख्य निवडणूक आयुक्त महा. राज्य यांचे कडे मिनार खोब्रागडे यांनी निवेदनातून केली मागणी..
विदर्भ 24न्यूज/
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- माहे फेब्रुवारी २०२० व मार्च २०२० च्या कार्यकाळातील ग्रामपंचायत निवडणूक साठी विविध उमेदवार यांच्या द्वारे भरण्यात आले एप्रिल २०२० मध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत इलेक्शन कोविड 19 चा होणारा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता त्याद्वारे रद्द करण्यात आले असून.
सदर निवडणूकिसाठी साधारणतः माहे फेब्रुवारी २०२० पासून तरुण युवक उमेदवार तसेच विविध उमेदवार यांनी आपला अमूल्य वेळ तसेच घरटॅक्स , ऑनलाईन फॉर्म भरणे, विविध कागदपत्रे , बँक पासबुक उघडणे , जात पडताळणी प्रमाणपत्र करीत फॉर्म भरणे तसेच अनामत रक्कम भरणे इत्यादी कामासाठी आपला पैसा खर्च केलेला असून.आपल्या द्वारे साधारणतः १७ मार्च २०२० ला इलेक्शन रद्द करण्यात आले त्यावेळेस गडचिरोली जिल्ह्यात कुठेही कोरोना चा एकही संशयित रुग्ण नसतांना सुद्धा इलेक्शन रद्द च्या कारवाही मुळे अनेक गरीब उमेदवारांचा अमूल्य वेळ व पैसा वाया गेलेला असून सदर निवेदनाद्वारे माझा व इतर उमेदवार यांचा लागलेला पैसे परत करणे जमत नसल्यास कमीत कमी वेळ तरी परत करावा जेणेकरून आपल्याला सुद्धा वेळेचे महत्व आहे असे गृहीत धरले जाईल असे तरुण युवक उमेदवार मिनार करमचंद खोब्रागडे मु.पो. येवली तह जि.गडचिरोली यांनी निवेनातून मागणी केली आहे.



