ग्रा.पं. निवडणुक पूर्वीचे अर्ज कायम ठेवा किंवा अन्यथा उमेदवाराचा खर्च परत करा..
-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांची मागणी..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ गडचिरोली:- फेब्रुवारी २०२० मध्ये घोषित ग्रामपंचायत निवडणुक दरम्यान ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल केले त्यांनी अनामत रक्कम, online अर्ज व कागदपत्रसह सर्व धावपळ करून ३ ते ४ हजार रु. खर्च केले असून, केलेला खर्च हा पूर्ण पणे वाया गेला त्यात सर्वसाधारण उमेदवारांना शारीरिक,मानसिक, आर्थिक त्रास सहन करावं लागलं आहे.करीता बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी द्वारे दाखल केलेले अर्ज कायम ठेवून व नवीन उमेदवारांचे अर्ज स्वीकारावे, अन्यथा उमेदवारांना आलेला खर्च ३००० ते ४००० रु उमेदवाराला वापस करा,अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, यांनी केली आहे.
सदर मागणी चे निवेदन देतांना सदाशिव निमगडे प्रभारी गडचिरोली, दिपक बोलीवार तालुकाध्यक्ष, प्रतीक डांगे मीडिया प्रभारी, प्रितेश अंबादे,वाकोडे सर, सतीश दुर्गमवार व कारकर्ते उपस्थित होते



