कृषि पंपाचे डीमांड भरूनही 3 वर्षापासून विज जोडनीच्या प्रतीक्षेत शेतकरी
कृषि पंपाचे डीमांड भरूनही 3 वर्षापासून विज जोडनीच्या प्रतीक्षेत शेतकरी
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/ तालुक्यातील ४९ शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये कृषि पंपाकरीता विज जोडणी करीता मागणी केली व डिमांड सुद्धा भरणा करण्यात आले.आजच्या तारखे पर्यंत जवळपास ३ वर्षाचा कालावधी लोटला असून आजच्या तारखेपर्यंत कृषी पंपाची विज जोडणी केलेली नाही.विजजोडणी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावा लागत आहे.शासनाच्या नियमानुसार डिमांड भरल्यानंतर ६ महिण्याच्या आत कृषि पंपाची विज जोडणी करणे आवश्यक होते. परंतु संबंधी विज वितरण कंपनी शाखा जिल्हा गडचिरोलीचे अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याचा व अधिकाराचा दुरुपयोग करून कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात कृषि पंपाची विज जोडणी केलेली नाही. त्या बद्दल जिल्हाधिकारी गडचिरोली तथा खासदार अशोक नेते, ऊर्जा मंत्री, तथा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जर का एक महिन्यापर्यंत विज जोडणी करून न दिल्यास शेतकऱ्यांचे जण आंदोलन करण्यात येईल असे आव्हान केले आहे निवेदन देतांना, निलकंठ कवडुजी संदोकर जिल्हा सचिव , भारतीय जन संसद शाखा , गडचिरोली व रुमाजी भुरले व व कार्यकर्ते उपस्थित होते.




