ग्राम पंचायत आमगाव येथे बार्टीच्या वतीने संस्कार वर्गाचे आयोजन
-सामाजीक न्याय विभाग व बार्टीच्या योजना एकाच मोबाईल अँप मध्ये- मनिष गणवीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
आमगाव:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने ग्राम पंचायत कार्यालय आमगाव येथे संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात समतादूत प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांनी बार्टीच्या व समाज कल्याण च्या योजनांची उपस्थित नागरिकांना माहिती दिली, तसेच सामाजिक न्याय क विशेष साहाय्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे चे *ई-बार्टी* हे मोबाईल अँप तयार केले असून यामध्ये बार्टी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा,व्यक्तिमत्व विकास,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ई-लायब्ररी, ई-क्लासरूम, समता विचार, बार्टीच्या न्युज इत्यादी माहिती अँप मध्ये असणार अशी माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली. समतादूत वंदना धोंगडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून संविधानातील मूलभूत कर्तव्य ,अधिकार यावर मार्गदर्शन केले तसेच संविधान उद्देशिका वाचन केले ,कार्यक्रमात ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.




