लोकअदालतीत 411 प्रकरण तडजोडीने निपटारा व चार लाखाच्या वर दंड वसूल…..

वणी :-वणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात “राष्ट्रीय लोकन्यायालयाचे” आयोजन करण्यात आले .लोक न्यायालयाचे उद्घाटन म्हणून चाफ़ले ,तालुका विधी सेवा समिती वणी तथा दिवाणी न्यायाधीश (क – स्तर ) यांच्या हस्ते करण्यात आले.
लोक न्यायालयात एकूण दोन पॅनल ची व्यवस्था करण्यात आली होती लोकन्यायालयात पॅनल क्रमांक 1. चे न्यायाधीश श्री. चापले हे दिवाणी व फौजदारी प्रकरणाचे पॅनल क्रमांक1 चे प्रमुख होते. तसेच पॅनल क्रमांक 2 चे न्यायाधीश .एस. बी .तिवारी हे दिवाणी व फौजदारी प्रकरणाचे पॅनल चे प्रमुख होते.
प्रकरणातील 411 फौजदारी प्रकरणात तडजोडीने निपटारा करण्यात आला असून, सर्व प्रकरणे मिळून एकूण चार लाख अकरा हजार दोनशे रुपये वसूल करण्यात आला.
लोकन्यायालयाच्या यशस्विते करिता न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक व तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक आर. बी .बढीये व कनिष्ठ लिपिक एस .एस. निमकर ,इतर न्यायालयीन कर्मचारी व वकील मंडळी यांचे सहकार्य लाभले.
.