व्याधीने त्रस्त असलेल्या व्यक्तीने केली आत्महत्या
व्याधीने त्रस्त असलेल्या व्यक्तीने केली आत्महत्या
सिंन्देवाही तालुक्यातील उटी माल येथील दिवाकर पत्रुजी कुळसंगे वय ५५ वर्षे याला गेल्या सहा महिन्यांपासून डोके दुखण्याचा त्रास होता.त्यामुळे तो वेडसर सारखा वागत होता पंधरा वीस दिवसांपूर्वी नवरगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.
परंतु त्याचे प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाली नसल्याने दिनांक १३/१२/ रोजी तो आपले स्वतःचे राहते घरी घराच्या लाकडी फाट्याला गळफास लावून आत्महत्या केली.
याची तक्रार मृतकाच्या भाचा छबिल दुर्योदास पेंदाम राहणार वासेरा यांनी पो.स्टे सिंन्देवाही येथे फिर्याद दिल्याने पो.स्टे चे अधिकारी व कर्मचारी जाऊन पंचनामा केला.
मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय सिंन्देवाही येथे हलविले.डॉक्टरांनी शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले.