सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
दिनांक 12 डिसेंबर 2020 रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य.कास्ट्राईब कर्म. कल्याण महासंघ शाखा सिंदेवाही तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सिंदेवाहीच्या वतीने बुद्ध विहार पंचशील नगर सिंदेवाही येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्मृतिशेष सेवचंद्रजी नागदेवते सर लाडबोरी/सिंदेवाही यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा परिचय प्रेमकुमार खोब्रागडे यांनी करून दिला.
याच कार्यक्रमात कु. रमा चरणदास डांगे पंचशील नगर सिंदेवाही हिचा NEET मध्ये आॅल इंडिया रॅंक अतिशय उत्तम असल्याने तिला GMC Nagpur येथे मेडिकलसाठी प्रवेश मिळालेला असल्यामुळे तिला प्रोत्साहन देण्यासाठी एक छोटासा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु. खराते सर शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष यांनी भुषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून आयु. दीपक मोटघरे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सिंदेवाही, तसेच जिल्ह्यातील संघटनेचे इतर पदाधिकारी, तालुका शाखेचे कास्ट्रा. चे तथा भारतीय बौद्ध महासभा सिंदेवाहीचे डॉ. राजपाल खोब्रागडे ‘ भैय्याजी निमगडे ‘ कोमल गेडाम ‘ प्रा . सेमस्कर ‘ सहदेव खोब्रागडे ‘ राजू खोब्रागडे , डांगे काकू ‘ मिनाक्षी बारसागडे ‘ इत्यादी पदाधिकारी आणि सभासद बंधू-भगिनी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन मा. भीमराव रामटेके सर सचिव यांनी केले. तर आभार प्रदर्शन आयु . विजय घडसे सर तालुका संघटक यांनी केले.
या कार्यक्रमासाठी बुद्ध विहार उपलब्ध करून देणारे पंचशील नगर सिंदेवाहीच्या सर्व बांधवांचे मनापासून आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕯🕯🕯



