रत्नापुर येथे वाघ मृत अवस्थेत आढळला
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवरगाव उपवनक्षेत्रांतील रत्नापूर बिटातील खांडला गावापासून अंदाजे ५०० मीटर अंतरावर पट्टेदार वाघ सकाळ सुमारास आढळून आल्यामुळे वनविभागासह नागरिकात खळबळ उडाली. घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी घटना स्थळावर बघ्यांची गर्दी झाली होती.
नवरगाव उपवनक्षेत्रांत मोठ्या प्रमाणात पट्टेदार वाघांचा वावर असून वाघाच्या हल्ल्याच्या घटनेसह वाघाच्या मृत्यूच्या घटना काही वर्षापासून उघडकीस येत आहे.
आज शनिवार सकाळच्या सुमारास वनरक्षक गस्तीवर असतांना खांडला गावाच्या जवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला १०० मीटर अंतरावरील परिसरात पट्टेदार वाघ आढळून आला असल्याने वनविभागात खळबळ उडाली. त्यानंतर वनाधिकारी यांनी घटनास्थळावर दाखल होवून घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यास सुरवात केली. त्या वाघाचा मृत्यू अंदाजे एक दोन दिवसात झाला असून त्या वाघीणीचे वय ६ ते ७ वर्ष असावे असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्युचे नेमके कारण कळू शकणार आहे.