वडेट्टीवार परिवाराला दिलेला प्रेम हिच आमची खरी संपत्ती..
वडेट्टीवार परिवाराला दिलेला प्रेम हिच आमची खरी संपत्ती..
शिवानी वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
गडचिरोली : आपल्या वडिलांच्या राजकारणाची सुरुवात गडचिरोली येथून झाली. येथे उपस्थित असलेले सर्व गणमान्य त्याचे साक्षीदार आहेत. विजय वडेट्टीवार हे या राज्यात ज्या पातळीवर पोहचले आहेत. याचे खरे श्रेय या जिल्ह्यातील जनतेचे आहे. तेच प्रेम मला मिळावे, बाबांवर (विजय वडेट्टीवार) आपण सर्वांनी केलेले प्रेम हीच आमची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन शिवानी वडेट्टीवार यांनी केले.
राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन विकास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कमल केशव मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, पंकज गुड्डेवार, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, प्रा. राजेश कात्रटवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतिश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, प्रदेश सरचिटणीस अतुल मल्लेलवार, जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर, काँग्रेस आदिवासी आघाडीचे डॉ. नितीन कोळवते, कुरखेडा तालुकाध्यक्ष जयंत हरडे, जि.प. सदस्य प्रल्हाद कर्हाडे, नितीन वायलालवार कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, तौफिक शेख, कल्पक मुप्पीडवार, सर्वेश पोपट,आकाश बोलुवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझ्या पेक्षा मोठे आहेत. त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करु शकत नाही, तरीही मला या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून मान दिला. हा खरा माझ्या कुटुंबावर असलेला प्रेम आहे. यापुढेही असेच सर्व एकत्रित येऊन पक्ष संघटनेत काम केल्यास, निश्चितच पक्षवाढीसाठी चालना मिळेल, अशी अपेक्षाही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

*शेकडो जणांचे रक्तदान*
राज्याचे मदत पुनर्वसन व बहुजन विकास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कमल केशव मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ह्याच्या बाराही तातुक्यातून युवकांनी गर्दी केली होती. सकाळ पासून सुरू झालेल्या रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले. या शिबिरात रक्त संक्रमण अधिकारी डॉ.ताडाम,डॉ. भुपेश उईके, श्री. सतीश ताडकलवार, नरेश कंदुकुरीवार, स्वप्नील चापले, जीवन गेडाम, श्री. देशमुख, कु. धनश्री, एजाज शेख, यांनी सहकार्य केले.




