सट्टा मटका खेळणाऱ्यास सिंदेवाही पोलिसांनी केली अटक
सट्टा मटका खेळणाऱ्यास सिंदेवाही पोलिसांनी केली अटक
पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत पळसगाव जाट येथील रहिवासी असलेला वसंत दामाजी शेंडे वय वर्षे ४७ हा मुंबई वरून खुलणाऱ्या वरली मटका सट्यावर परिसरातील लोकांकडून पैसे घेऊन कागदावर आकडे लिहून हार जीत चा खेळ खेळत असताना सिंदेवाही पोलिसांना आढळून आला. सदर आरोपीला सिंदेवाही पोलिसानांनी ताब्यात घेऊन अंगझडती केले असता त्याच्या कडून एकूण ७३०/- रुपयाचा रोख व एक बॉलपेन किंमत रुपये ५ असा एकूण ७३५/ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी वसंत शेंडे याच्यावर सिंदेवाही पोस्टे. ला अप. क्र. ५५२/२०२० नुसार म. जु. का. अन्वये कलम १२ (अ) दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार एपीआय योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार पो.हवा. प्यारेलाल बांबोळे करीत आहेत.