जिल्हास्तरीय ऑनलाइन बालकवि 2020 सम्मेलनात कायर येथील जि .प .शाळेचे विद्यार्थी प्रथम क्रमांक वर्षा राकेश शंकावार तर द्वितीय क्रमांक चंचल झोड़े हिने बहुमान पटकविला

वणी( 10 .डिसें.) :- ‘माझी कविता, माझे विश्व ‘ या जिल्हास्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली .यात सुमारे साडेचारशे बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्य प्रतिभा सादरीकरण करण्याची संधी ऑनलाईन बालकवी संमेलनात देण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अरविंद झलके ( जिल्हाध्यक्ष अमसिशाप, यवतमाळ)तसेच संमेलाध्यक्ष किशोर तळोकार( कवि साहित्यिक अमरावती )हे होते.
दि 8.12.2020 रोजी त्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांचे काव्य ऑनलाइन सादर करण्यात आले .
यात निकाली प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली .त्यामधुन वणी तालुक्यातील जि.प .शाळा कायर ,येथील वर्षा राकेश शंकावार हिने वर्ग 6 ते 8 गटातून प्रथम क्रमांक, तर चंचल मनोज झोडे हिने वर्ग 1ते 5 या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
विद्यार्थी यशाचे श्रेय मार्गदर्शक म्हणून कुमुदिनी देवतळेव तसेच कायर येथील मुख्यध्यापक शेखन्ना भिंगेवार,सहकार्य-शेकन्ना भिंगेवार मु.अ.,रंजना तुपे तथा सर्व शिक्षक वृंद यांना दिले.



