गडचिरोली येथील मुख्य चौकात कृषी विधेयका विरोधात निदर्शने

विदर्भ 24 न्यूज
प्रतिनिधी प्रतिनिधी / गडचिरोली :- नव्या कृषी कायद्याला विरोध करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व किसान क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते च्या वतीने आज ८ डिसेंबरला भारत बंदला गडचिरोली येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले असून गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकानंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
त्यामुळे केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनानी आज ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘ भारत बंद ‘ पुकारला आहे. त्यामूळे आजच्या बंद मध्ये या दरम्यान बाजरपेठ बंद करुण इंदिरा गांधी चौकात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व किसान क्रांती मोर्चा च्या वतीने सदर कृषी विधेयका विरोधात निर्देशने करण्यात आले.
यावेळी बहुजन रिपब्लिकन शोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोडे, किसान क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते तारका जांभुळकर,जयंत गेडाम, नंदेश्वर, प्रतीक डांगे, सतीश दुर्गमवार, जितेंद्र बांबोळे रायपुरे आदी कारकर्ते उपस्थित होते..