मारेगाव येथे ओबीसी विशाल मोर्चाची कृती समिती गठीत
वणी ( 8.डिसें ) :- “ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे “ह्या प्रमुख मागणी साठी उपविभागीय कार्यलयावर ओबीसी विशाल मोर्चा 3 जानेवारी 2021 ला आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संयुक्त कृती समितीत्या गठीत करण्यात आली .
काल दिनांक 7.12.2020 ला मारेगाव येथे कृती समितीचे गठन करण्यात आली.ह्या बैठकीत मोर्चाचे नियोजन कसे राहील? ह्या बाबत प्रवीण खानझोडे ,ऍड अमोल टोंगे ,राजाभाऊ तुराणकर यांनी मार्गदर्शन केले . यांच्या उपस्थितीत मुख्य समन्वयक म्हणून बाबाराव ढवस यांची नियुक्ती करण्यात आली.
राजेंद्र पिंपळशेंडे,भास्कर राऊत ,प्रवीण लोंढे, मंगेश गवळी ,आकाश किन्हेकर, अनुप महाकुलकार, संदीप आस्वले ,आनंद नक्षीने, मुजफ्फर शेख ,राजेंद्र पोटदुखे ,किशोर ताटकोंडावर , सचिन पचारे समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली .
बैठकीला लीलाधर चौधरी, हेमराज कळंबे, विस्वास पोटे, अनामिक बोढे ,अंनताजी मांडवकर , अनंत महाकुलकार ,विजय झाडे ,संजय खाडे, प्रवीण लोंढे व अविनाश चिंचोलकर असे ओबीसी बांधव उपस्थित होते .



