राजूर येथे१०० % कड़कड़ीत बंद…. शेतकऱ्यांच्या” भारत बंद” ला समर्थन
सर्वपक्षीय व संघटनांची रॅली व जाहीर सभा
राजूर कॉलरी( 8 .डिसें.) : कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीला होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला व त्या साठी दोनशेच्या वर शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद ला समर्थन करीत यवतमाळ जिल्ह्यातील चुना उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या राजूर कॉलरी तील सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेने राजूर बंद चे आयोजन करून १०० % कडकडीत बंद करून पाठिंबा दर्शविला. त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देऊन कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनांना विश्वासात न घेता कृषी कायदा संसदेत चर्चा न करता पारित करून घेतल्याने व तीन कृषी कायदे शेती व्यवस्था नष्ट करून भांडवलदारांच्या घशात घालणारे असल्याचे लक्षात येताच देशभरात ह्या कृषी कायद्याला विरोध होणे सुरू झाले व देशातील सर्वच शेतकरी संघटनांना हा कायदा रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
पंजाबच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत दिल्ली येथे येऊन प्रचंड सरकारची दडपशाही व विरोध झेलीत आंदोलन करीत आहेत, त्यालाच पाठबळ देण्यासाठी भारत बंद चे आयोजन करण्यात आले. ह्या ८ डिसेंबर च्या भारत बंद मध्ये सहभागी होत राजूर वासीयांनी १०० % प्रतिसाद देत एक दिवसीय बंद पाळला.
स्वयंस्फूर्तीने येथील सर्वच लहान मोठ्या व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन या बंद मध्ये भाग घेतला. बंद दरम्यान सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली आणि येथील शहीद भगतसिंग चौकात जाहीर सभा घेण्यात आली.
या राजूर बंद च्या आंदोलनात माजी पं स सदस्य अशोकभाऊ वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद मिलमिले, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, डेव्हिड पेरकावार, मोहम्मद असलम, ऍड अरविंद सिडाम, अश्फाक अली, महेश लिपटे,रियाजुल हसन, प्रदीप बांदुरकर, नंदकिशोर लोहकरे, सतीश तेडेवार, नितीन मिलमिले, साजिद खान, अन्वर आदींनी सहभाग घेतला.