फ्री मेथोडिस्ट चर्च वणी येथे तिसरा समर्पण दिन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीत साजरा
वणी ( 7 .डिसें) :- तालुक्यातील सर्वात मोठा व भव्य प्रार्थनास्थळ समजला जाणारा फ़्री मेथोडिस्ट चर्च वणी येथे दिनांक 7 .12 .2019 रोजी समर्पण दिन सोहळा चर्चच्या मंडळी तर्फे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
covid-19 च्या प्रादुर्भावाच्या बचावासाठी शासनाने दिलेल्या सूचना लक्षात घेऊन यावर्षी चर्चमध्ये छोट्या प्रमाणात का होईना ,परंतु जल्लोषात अगदी साध्या पद्धतीने साजरा केले.
त्यात काही महिलवर्ग ह्यांनी स्तुति आराधना अत्यंत हृदयपूर्वक गायिले,लहानमुलांमधे सुद्धा उत्साहाचे वातावरण होते .त्यानीही नृत्य मंडळीसमोर सादर केले .
ज्येष्ठ ,महिला व तरुण वर्गाने देशासाठी व देशात झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत देश लवकरात लवकर ह्या परिस्थितितुन बाहेर यावे.
त्यांच्या सर्वांसाठी प्रार्थना सुद्धा करण्यात आल्या .यावेळी उपस्थिती म्हणून वणी चर्च मंडळी होते.