शेतकऱ्यांच्या भारत बंदला समर्थन करीत राजूर बंद…..
व्यावसायिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन
राजूर कॉलरी ( ७ डिसें ): येथील ग्रामपंचायत सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन एकमताने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन करीत भारत बंद निमित्त राजूर येथेही एक दिवसीय कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार कडून शेतकरी विरोधी पारित करून घेण्यात आलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहे, त्यातच पंजाबच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रचंड थंडीत सरकारच्या विरोध झेलीत दिल्ली कूच करीत जोपर्यंत हे कृषी कायदे रद्द होत नाही तोपर्यंत दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्धार केला.
आधीच २०६ शेतकरी संघटनांच्या ह्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत होते, त्याला पंजाबच्या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने धार चढलेल्या आंदोलनाला उभारी आली असून ह्या २०६ शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर ला देशव्यापी भारत बंद पुकारला आहे, ह्या भारत बंद ला देशभरातील सर्वच पक्षांनी व संघटनांनी समर्थन दिले आहे. त्याच अनुषंगाने राजूर कॉलरी येथेही १०० टक्के बंद यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे
येथील ८ डिसेंच्या बंद यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गावात फिरून सर्व लहान मोठे व्यावसायिकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.
या सर्वपक्षीय बैठकीला जि प सदस्य संघदीप भगत, माजी पं स सदस्य अशोकभाऊ वानखेडे, मारोती पाटील बलकी, महादेव तेडेवार, श्रीनिवास अंधेवार, मोहम्मद असलम, अश्फाक अली, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, साजिद खान, , शंकर बोरगलवार, सुशील आडकीने, अजय बोरगलवार, बावणे आदी उपस्थित राहून व गावात जनजागृती करून शेतकऱ्यांचा भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.