उद्या 8 डिसेंबरला शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात वणी बंदची हाक ……
विविध राजकीय पक्ष संघटनांचे आवाहन……..
वणी( 7 .डिसें .) – केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणुन वनीतील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने किसान संघर्ष मोर्चा चे नेत्रूत्वात वणी येथे बंद पाळण्याचा निर्णय स्थानिक नेत्रुत्वानी आज झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेतला आहे.
समविचारी शेतकरी संघटना,कामगार, विध्यार्थी, युवक,महिला,व समाजसेवी संघटना,शिक्षक, वकील, डॉक्टर,पत्रकार या शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी वणी बंद करीता छत्रपती शिवाजी चौक वणी येथे सकाळी 8 वाजता येऊन सहभागी व्हावे, असे आवाहन किसान संघर्ष मोर्चा वणी यांनी केले आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी भारत बंदच्या दिवशी वणी बंद व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे असे आवाहन करत आहे.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वणीतील जनतेने भारत बंदच्या दिवशी वणी बंद ठेवून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे असे आवाहन किसान संघर्ष मोर्चा चे कॉ. शंकरराव दानव, अँड, देवीदास काळे, जयसिंग गोहोकार,डॉ. महेंद्र लोढा, मंगल तेलंग,अजय धोबे, अँड, दिलीप परचाके, विवेक मांडवकर, मिलिंद पाटील, रुद्रा कुचंनकर,अँड. विप्लव तेल्तुम्बडे,दिलीप भोयर,गीत घोष करीत आहे.



