डोंगरगाव येथे बोद्ध बांधवाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन संपन्न
ग्रा.पं. सदस्य दिपक बोलिवार, व समाजाचे अध्यक्ष रवींद्र रायपुरे, यांनी महामानवाच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व हार केले अर्पण
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
डोंगरगाव :- महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिन संपन्न करताना भारतीय समाजातील मनुवादी विषमतेचे विचार जाळून समता,स्वातंत्र्यचे राज्य निर्माण करून देशात बंधुभाव निर्माण करणारे एकमेव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर असून आज त्यांच्या या स्मृतिदिना निमित्त डोंगरगाव येथील बोद्ध बांधवानी एकत्र येऊन कोविड19 च्या नियमाचे उलघन न करता महामानवाच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्य दिपक बोलिवार, तसेच तथागत गौतम बुध्दाच्या प्रतिमेला रवींद्र रायपुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले. महामानावास विनम्र अभिवादन करून निळ्या ध्वजाचे ध्वजावतरन समाजाचे अध्यक्ष रवींद्र रायपुरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित म्हणून करमचंद बांबोळे, संघरक्षित बांबोळे, केशव मेश्राम, रवींद्र लोणारे, प्रमोद शेंडे, किशोर रामटेके व बोद्ध उपासक तथा उपासिका आदि उपस्थित होते.




