Vidarbh24News

Latest Online Breaking News

गत 24 तासात 130 कोरोनामुक्त 102 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू Ø आतापर्यंत 18,662 बाधित झाले बरे Ø उपचार घेत असलेले बाधित 1,807

चंद्रपूर, दि. 6 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 130 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 788 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 662 झाली आहे. सध्या एक हजार 807 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 55 हजार 685 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 32 हजार 636 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहराच्या सिव्हील लाईन मधील 73 वर्षीय पुरुष, पंचशील वार्डातील 73 वर्षीय महिला व बालाजी वार्ड येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 319 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 296, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 102 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 35, चंद्रपूर तालुक्यातील आठ, बल्लारपुर तालुक्यातील सात, भद्रावती 10, ब्रम्हपुरी नऊ, नागभिड तीन, सिंदेवाही तीन, मुल एक, सावली दोन, राजुरा पाच, चिमुर सहा, वरोरा सात, कोरपना एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!