राजुर येथील युवकांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त विहारात जाऊन परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली……
वणी ( 6 डिसें ) :- आज ज्ञानसूर्य बोधिसत्व, परम पुज्य, महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानावास विनम्र अभिवादन राजुर येथील युवकांकडून करण्यात आले.
भारतीय समाजातील मनुवादी विषमतेचे विचार जाळून समता,स्वातंत्र्यचे राज्य निर्माण करून देशात बंधुभाव निर्माण करणारे एकमेव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर असून आज त्यांच्या या स्मृतिदिना निमित्त राजुर येथील भव्य विहारात युवक एकत्र येऊन कोविड19 च्या नियमाची पायमल्ली न करता महामानवाचा अर्द्धकृति पुतळ्याला पुष्पगुच्छ व हार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी उपस्थिती म्हणून रवि सोनटक्के, अंकुश पेटकर प्रांजल खैरे ,स्वप्निल कवाड़े,नितीन भगत ,नितिन पुड़के, महेश लिपटे ,अशोक वानखेड़े ,यशवंत पाटील, गोवर्धन दुर्योधन , जांगड़े व बहादे आदि होते.
===================================



