सावली शहरात घाणीचे साम्राज्य…….संपूर्ण शहरात खड्डेच खड्डे
सावली शहरातील वार्ड क्र. 7 व 8 वार्डातून बसस्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग मागील एक महिन्यापासून खोदून ठेवला असल्यामुळे परिसरातील नागरिकांना जाता-येतांना खूप त्रास होत आहे. सावली शहातील संपूर्ण गल्ल्या खोदून ठेवल्या आहेत.त्यामुळे घंटागाडी किंवा भाजीपाला विक्रेते येऊ शकत नाही. नागरिकांना आपली स्वताची मोटार सायकल बाहेर काढता येत नाही. म्हाताऱ्या लोकांना रस्त्यावरून चालणे दुरापास्त झालेले आहे.

शहरातील वार्ड क्र. 7 व 8 वार्डातून बाजाराकडे जाणारा मुख्यमार्गावर घाणीचे साम्राज्य आहे. रस्त्याच्या कडेला संदूरसोकाचे झाडे वाढले आहेत व ते रस्तावर पसरलेले आहेत दसऱ्या बाजूला रोड खोदलेला आहे त्यामुळे रस्त्यावरून जातांना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते. म्हातारे लोक या रस्त्यावरून जाऊ शकत नाही.

या गंभीर समस्येबद्दल वार्डतील नगरसेवकाशी चर्चा केली असता, नगरसेवक आम्हचा कालावधी संपला असे सांगतात आणि नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला आज करू उद्या करू अशी टोलवाटोलवीची उत्तरे देतात. नागरिकांपुढे आता कुणाला सांगावे व काय करावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नगरपंचायतने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता साफ करावा व पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.




