*वाकलेले पोल दुरूस्ती करण्याची चेकठाणेवासना येथील नागरीकांची मागणी.*
*कार्यकारी उप अभियंता पोंभूर्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.*
पोंभूर्ना तालुक्यातील मौजा चेकठाणेवासना येथील अरूण कानकाटे यांच्या घराजवळ विद्युत पोल अतिशय वाकल्यामुळे तारामध्ये सैलपना आलेला आहे त्यामुळे भविष्यात मोठा घातपात होण्याची शक्यता आहे व विज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.त्याचा त्रास गावकर्यांना सुद्धा होऊ शकतो.त्याची खबरदारी म्हणून वेळीच वाकलेल्या पोलला तणावा देऊन दुरूस्ती करण्याची मागणी चेकठाणेवासना येथील गावकऱ्यांनी केली आहे.
तसेच मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विद्युत पुरवठा सुरळीत करीत आहे परंतु गावाचे आकारमान वाढत असल्याने गावाच्या तुलनेत विद्युत व्यवस्था तोकडी पडत आहे.सचिन कन्नाके ते मुल रोड व रमेश दिवसे ते नाल्यापर्यंत वाढीव पोल मंजूर करण्याची मागणी चेकठाणेवासना येथील वैभव पिंपळशेंडे, गुरूदेव पिंपळशेंडे, रमेश दिवसे, निळकंठ मेडपल्लीवार, भारत कामटकार, रोशन उपासे, विनोद निखाडे, वासुदेव गौरकार, इंदरशाह मडावी, विठ्ठल वाढई आदींनी कार्यकारी उप अभियंता शाखा पोंभूर्णा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.



