ऑनलाइन आरक्षण नसल्याने 9 हजार रुपये घेउन ताडोब्यात प्रवेश
ताडोबा जागतिक पर्यटन स्थळ व्याघ्र प्रकल्प येथे दिवसेंदिवस जगभरातील पर्यटकाची गर्दी होत असते ताडोबा वाघांसाठी प्रसिद्ध असल्याने इथे नेहमी देश विदेशातून पर्यटक येत असतात . इथे येन्या साठी ऑनलाइन आरक्षणाची सुविधा आहे. पन ऑनलाइन आरक्षन हे मर्यादीत आहेत. ताडोबा मध्ये ऑनलाइन आरक्षण मिळत नसल्यास गेट वरुन आरक्षण मिळण्याकरिता ताडोबा कोअर झोन मधील दोन वनरक्षकांनी नऊ हजार रुपये घेऊन पर्यटकांना ताडोबात प्रवेश दिल्याची माहिती मिळाली असल्याने नवेगाव कोअर प्रवेशद्वारावर वनरक्षक टेकचंद सोनूले यांनी एका खाजगी सचिन कोयचाडे व्यक्तीला सोबत घेत हा प्रकार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला.


सदर आरोपी 1 डिसेंम्बरला नवेगाव प्रवेश द्वारावर पर्यटकांकडून पैसे घेत गेटच्या आत प्रवेश देत असल्याची माहिती क्षेत्र संचालक यांना मिळाली तात्काळ त्यांनी नवेगाव प्रवेशद्वार गाठून दोघांना सक्तीने विचारपूस केली असता, पर्यटकांकडून 9 हजार रुपये घेउन प्रवेश घेतले असे त्यांनी कबुली दिली.
असा प्रकार अनेकदा केला असल्याचे सुद्धा क्षेत्रसंचालक यांच्या समक्ष वनरक्षक सोनूले व कोयचाडे यांनी सांगितले. दोघांविरुद्ध चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार देत ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पचे आरक्षण मिळविण्यासाठी वनविभागाने कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही, पर्यटकांनी अश्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, आरक्षणासाठी www.mytadoba.org या संकेतस्थळाचा वापर पर्यटकांनी करावा असे आवाहन ताडोबा व्याघ्रप्रकल्पतर्फे करण्यात आले आहे.



