Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीसांना विधानसभेत उलटे टांगू म्हणणारे माजी पाणीपुरवठा मंत्री व भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची आमदारकी रद्द करा

-पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली मागणी

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
उस्मानाबाद: -२९नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार व महाराष्ट्राचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनी द्वारे परतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्याजवळ परतुरचे प्रोबेशनरी IPS अधिकारी असलेले हसन गौहर यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून IAS व IPS अधिकाऱ्यांचा तसेच महाराष्ट्र पोलीसांचा अपमान करून पोलीसांना विधानसभेत उलटे टांगू असे अपमानजनक वक्तव्य केले होते.
त्याच्या निषेधार्थ बबनराव लोणीकर यांचेवर योग्य ती कार्यवाही करून त्यांची आमदारकी रद्द करा या मागणीचे आज पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचे मार्फत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन दिले, यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांचे सोबत शुभम कदम, अजयसिंग ठाकूर, योगेश पवार उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!