जि.प. शिक्षक प्रदिप पेंदोर यांचे अल्पशा आजाराने निधन
वणी( 28नोव्हे ) :-वणी पंचायत समितीमध्ये मागील 15 वर्षा पासुन कार्यरत असलेले जि.प. शिक्षक प्रदिप पेंदोर सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रदीप पेंदोर याांनी जि.प. शिक्षक संघटनेमध्ये विविध मोठ्या पदाची जवाबदारी स्विकारून, शिक्षकांच्या व विद्यार्थांच्या समस्या, शासन दरबारी मार्गी लावण्याचे कार्य केले आहे. प्रदिप पेंदोर यांचा जाण्याने,
संपुर्ण तालुक्यातील जि.प. शिक्षकामध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
त्यांची लढाऊ वृत्ती आणी सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या शैलीमुळे ,पेंदोर निरंतर शिक्षकांच्या ,मित्र परिवाराच्या तसेच सगे संबंधिताच्या स्मरणात निरंतर राहील . ग्रेट मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष अशोक चौधरी ,राजेश निरे व ईब्टा शिक्षक संघटनेच्या वतीने दिवाकर राऊत, राजेश बोकडे ,राजू साखरकर ,संजय साखरकर, आनंद शेंडे यांनी श्रद्धांजली वाहून भावना व्यक्त केल्या.
राळेगाव येथील त्यांच्या घरी त्यांचे पार्थीव अंतदर्शना साठी ठेवण्यात येणार असुन , शनिवार दुपार 1 पर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पेंदोर यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असुन त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



