बोदली गावात संविधान दिन साजरा..
बोदली गावात संविधान दिन साजरा..
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/बोदली:-संविधान बाबत प्रत्येक गावात व जनमानसात जाग्रुती निर्माण व्हावी याकरिता संविधान दिनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आकाशजी निकोडे माजी सरपंच बोदली, प्रमुख अतिथी रामदासजी पिपरे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा. सुधाताई चौधरी जिल्हाअध्यक्ष माळी समाज संघटना गडचिरोली. मा. सुरज कोडापे संविधान अभ्यासक व मार्गदर्शक गडचिरोली. प्रमुख पाहुणे मा. संजय रामगुंडेवार, धम्मराव तानादु, सिध्दार्थ मेश्राम, रूपेश मेश्राम होते.
दिपप्रज्वलन व महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली मा. सुरज मोहुर्ले यांनी भारतीय संविधान प्रस्तावनेचे सामुहीक वाचन करण्यात आले.
घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी असता संविधनाबाबत जागृत होऊन संघर्ष करणे ही काळाची गरज झालेली आहे त्यामुळे संघर्ष करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येऊ लढा देणे गरजेचे आहे,असे आवाहन मार्गदर्शक सुरज कोडापे यांनी केले.
सोबतच ओबिसी जातीनिहाय जनगणना होणेबाबत व ओबिसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण घटनेतील तरतुदी अन्वये मिळणेबाबत मार्गदर्शन चौधरी मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन युवराज मेश्राम यांनी केले, प्रस्तावना राजेंद्र कोडापे यांनी केले, तसेच कैलास सोनुले यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक मेंगाजी कोडापेयांनी, श्रिरंग मोहुर्ले, सुरेश वाढई, लालाजी पिपरे, महेंद्र निकोडे, सुरज मोहुर्ले,अश्विनी कोडापे, पंदिलवार ताई, कैलास सोनुले, अविनाश कोडाप, तुमदेव नैताम, नितेश मेश्राम, नितीन निकोडे इत्यादींनी युवा फ्रेंड्स क्लबचे सर्व सदस्य आणि ग्रामस्त उपस्थित राहून कार्यक्रम साजरा करण्यात आला.




