चिंचोली येथे संविधान दिन सप्ताह कार्यक्रम बुध्द विहार येथे साजरा
चिंचोली येथे संविधान दिन सप्ताह कार्यक्रम बुध्द विहार येथे साजरा
विदर्भ 24न्यूज जिल्हा प्रतिनिधी/चिंचोली:-आज रोजी २७नोव्हेंबर चिंचोली येथे संविधान दिन सप्ताह कार्यक्रम बुध्द विहार येथे घेण्यात आले या कार्यक्रम करिता प्रमुख उपस्थित माननीय गणवीर सर (प्रकल्प अधिकारी चंद्रपूर )बुध्द वीहारचे अध्यक्ष लांडगे सर, सचिव सर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच संविधान ऊधेश पत्रिका देऊन सर्वांचं स्वागत करून बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आले प्रकल्प अधिकारी गण्वीर सर यानीही barti चे कार्य व संविधानाने आपल्याला काय दिले त्याची माहिती देऊन विविध योजनांची माहिती दिली समतादूत रज्जू ताई मेण्ढुल्कर (सूर्यवंशी )यानी २०१५ पासून barti च्या माध्यमातून काय कार्य होत आहेत याची सविस्तर अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा कारेगूवार समता दूत यानी केले तर आभार रज्जू मेण्ढुल्कर यानी केले हा संविधान सप्ताह ६ डिसेंबर पर्यन्त चालणार असून या ठिकाणी संविधान प्रास्ताविक चे वाचन करण्यात आले, कार्यक्रमासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते..




