बार्टी मार्फत संविधान दिन साजरा
बार्टी मार्फत संविधान दिन साजरा
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
कोरची:- दि.२६नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे जिल्हा कार्यलय गडचिरोली व बोडेना येथील युवा बिरसा संघटना यांच्या संयुक्त विध्यमाने संविधान दिवस कार्यक्रम जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवातिस संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमाना दिप प्रजवलीत करून संविधान दिनाचा सुरवात करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी गावातील शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष शिवेंद्र कुंजाम हे होते.तर प्रमुख उपस्थिती भलावी सर जि.प.प्रा. शाळा बोडेना हे उपस्थित होते,तर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून बर्टीचे समतादूत जयलाल सिंद्राम होते सिंदराम यांनी देशाचे प्रतीक म्हणजे संविधान या विषयी गावातील लोकांना संविधान उद्देशिका वाचन केले आणि संविधानाचे महत्व सांगितले.या वेळेला गावातील पो.पा.सुमेनसिंग मडावी,प्र.ना.सगणु गावळे, अंगणवाडी सेविका उषाताई तिरगम, आशा वर्कर विना ताई तिरगम,ग्राम.सदस्य, ग्राम सभा अध्यक्ष,आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा बिरसा संघटनाचे अध्यक्ष प्रेमदासजी गोटा यांनी केले.तर आभार प्रदर्शन, योगेश मडावी यांनी मानले यांनी मानले.
या वेळेस गावातील अनेक गावकरी,बालगोपाल संविधान दिनानिमित्त बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343




