पांढरकवडा येथे एका निवासस्थानी मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा
पांढरकवडा (26 .नोव्हे) :- बबनराव सोयाम वैभवनगर पांढरकवडा यांचे निवासस्थानी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला .या प्रंसगी शेजारील लोकांना सहभागी करुन घेण्यात आले
संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन मराठासेवा संघ पांढरकवडा तालुका अध्यक्ष शिवश्री विजयराव गोडे यांनी केले.आदीवासी परधान समाज संघटना जिल्हा अध्यक्ष बबनराव सोयाम यांनी भारतीय सविधान दिन हा एखाद्या सणा ऊत्सवा प्रमाणे घराघरात साजरा व्हावा ,अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारतीय संविधान जनजागृती ही अत्यंत आवश्यक असून मानवी मुल्याची जोपासना करणारे व मानवाच्या विकासास आवश्यक तरतुदीनी परिपूर्ण जगातील आदर्श संविधान म्हणजे भारतीय संविधान डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परिश्रमातून भारतीय जनतेला मिळालेली एक अमुल्य देणगी आहे.
या प्रंसगी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय सविधानाला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन अॕड.प्रंशात सोयाम,कु रुपाली सोयाम,धिरज सोयाम , कु.तेजश्री गोडे यांनी केले.



