राजनगट्टा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
राजनगट्टा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ राजनगट्टा:-नेहरू युवा केंद्र ,गडचिरोली अंतर्गत छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा व वीर मराठा युवा मंडळ कुंभरवाही च्या वतीने राजनगट्टा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला असून यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय सविधांन ग्रंथाला पुष्प अर्पन करून नमन करण्यात आले. व समस्त मान्यवर आणि गावातील युवकांसमवेत संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान किंवा अन्य कोणताही ग्रंथ हा फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून तो डोक्यात घालून जगण्याचा विषय आहे. सद्या स्थितीत एकीकडे संविधान सम्पवण्याचा षड्यंत्र होत असून आता घरा घरात संविधान पोहचवण्याचा काम युवकांनी करायला हवे असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पवन आभारे तालुका समनवयक NYK, मंडळांचे अध्यक्ष उमेश भांडेकर, सचिव अनुप कोहळे गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंतजी कोहळे ,मारोतीजी सोमनकर आदी गावकरी, व राजनगट्टा आणि कुंभारवाही येथील युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सम्पूर्ण आयोजन छत्रपती शिवाजी युवा मंडळ राजनगट्टा व वीर मराठा युवा मंडळ कुंभारवाही च्या सम्पूर्ण समूहाने मिळून केले.



