बार्टी कडून संविधान दिन पंधरवड्याची सुरवात
बार्टी कडून संविधान दिन पंधरवड्याची सुरवात
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा कार्यालय गडचिरोली समतादूत च्या वतीने ६ डिसेंबर २०२० पर्यंत संविधान दिन पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून देसाईगंज तालुक्यात शासकीय नियमांचे पालन करून या पंधरवड्यात विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
ग्राम पंचायत विहिरगाव येथून या पंधरवड्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, मनिष गणवीर प्रकल्प अधिकारी यांनी बार्टी ने आयोजित केलेल्या संविधान पंधरवाड्यात कोणते कार्यक्रम व कश्या पद्धतीने करणार याची माहिती दिली तसेच बार्टी विषयी व बार्टीच्या योजना विषयी माहिती आपल्या प्रस्ताविकेतून करून दिली. समतादूत वंदना धोंगडे यांनी उद्देशिका वाचन करून भारतीय संविधान मधील काही कलमाची माहिती दिली.
हा कार्यक्रम प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात गुलाब भोयर (ग्रामसेवक), राजू शंभरकर ( सामाजिक कार्यकर्ते) , मनिष गणवीर प्रकल्प अधिकारी ,वंदना धोंगडे समतादूत ,दिलावर इसमाइल पठाण (रो.से.) दौलत मुंडरे (ग्राम पंचायत परिचर) सुषमा झुरे, माया डोनाडकर अंगणवाडी सेविका, दीप्ती जेंगळे संगणक परिचालक ,योगिता उईके ग्राम प्रवर्तक व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांना संविधान उद्देशिका व बार्टीने प्रकाशित केलेली पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. गुलाब भोयर यांनी ग्रामपंचायत विहिरगाव च्या वतीने बार्टीचे व उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त केले.




