एक जन्मदिवस असाही !
नाही कुणी आपल म्हणणार
नाही कुणी साथ देणार
लोकांच्या या गर्दीत
शोधतेय कुणी आपलसं करणार……..
बोलायला सोप्प असत हो साहेब, म्हणायला मदत करा गरीबाची पण खरंच का उरली जाणीव हि सामाजिक दायित्वाची असच एक व्यक्ती बद्दल आज लिहतोय. रुपचंद लाटेलवार ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. स्वतः गरीब परिस्थितीतून स्वतः:ला सावरून आज आणि आपल्या संबंध जीवनात यांनी करता येईल ती मदत अनेक गरीब,गरजू,अपंग, निराधार लोकांना केली आहे. परंतु आज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्याने यांनी आपला वाढदिवस निराळ्या पद्धतीने साजरा केला. रुपचंद लाटेलवार हे स्टुडंट कंप्युटर चे मालक आहेत. त्यांनी आपल्या कंप्युटर इंस्टीट्यूट च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचे फार्म गरीब,गरजू, अपंग,निराधार लोकांना अगदी मोफत भरून दिले. जसे जीवन प्रमाणपत्र,(हयातीचा दाखला), अपंग, निराधार,विधवा योजना,जेष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या तिकीट सवलती, पंतप्रधान किसान योजना, व विहिरीचे फार्म अगदी निःशुल्क भरून दिले.आणि खास म्हणजे आज त्यांच्या वाढदिवसापासून त्यांनी हा संकल्प केला कि, त्यांच्या वडीलांच्या जन्मदिवसापर्यंत ०१ जाणेवारी २०२० पर्यंत गरीब,गरजू, अपंग,निराधार लोकांना ते आपल्या इंस्टीट्यूट मार्फत अगदी निशुल्क अर्ज (फार्म) भरून देणार आहेत. समोर ते आमच्या विदर्भ २४ न्युज च्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले कि, जो पर्यंत आपन आपआपल्या परीने सहकार्य करणार नाही तोपर्यंत समाज प्रगत होणार नाही म्हणून प्रतेकानी सामाजिक दायित्व जपुन जमेल तशी होईल तितकी मदत गरीब,गरजू, अपंग,निराधार लोकांना करावी.
एक मेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ!
अशा उद्दात हेतू ठेऊन जगणाऱ्या आमच्या लाडक्या मनमिळावु रुपचंद लाटेलवार यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी व जन्मदिवसाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा.
बातमी संकलन – कुनाल उंदीरवाडे का.सं. विदर्भ २४ न्युज