विदर्भ24न्यूज़ चे मुख्यसंपादक व स्टुडंट मल्टीपर्पस सोसायटीचे सचिव रूपचंद केशवराव लाटेलवार यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

वणी – स्टुडंट मल्टीपर्पस सोसायटीचे सचिव व विदर्भ24न्यूज़ चे मुख्यसंपादक रुपचंद केशवराव लाटेलवार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या घरी जाऊन जिवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) काढून देण्यात आला.
अपंग, निराधार व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन पैसे विथद्राल करून देण्यात आले. जेष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाचे अर्ध्या तिकिटाचे कार्ड काढून देण्यात आले. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचे फार्म मोफत भरून देण्यात आले.
अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना विहिरीचे फार्म भरून देण्यात आले.
अशा वेगवेगळ्या योजनेचे फार्म मोफत भरून देण्यात आले आणि हा सपाटा ते नवीन वर्ष २०२१ पर्यंत चालू ठेवणार आहे. १ जानेवारी २०२१ ला त्यांच्या वडिलाचा ७७ वा वाढदिवस आहे.
तोपर्यंत अश्याच प्रकारची मोफत सेवा करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
आम्हच्या प्रतिनिधिनी आपण सव्वा महिना निशुल्क सेवा कसे काय देता. असा प्रश्न विचारला असता आपआपल्या परीने समाजासाठी जे काही शक्य होत होत असेल ती मदत करावी.श्रमिक असेल तर त्याने श्रमदान कराव, श्रीमंत असेल तर भोजनदान करावे अस त्यांनी सांगितलं.