सकनेगाव मूलभूत सुविधापासून वंचित , प्रशासनाचे फिरते पाठ ?
वणी:- तालुक्यापासुन 13 किलो अंतरावरिल सुकनेगावची अत्यंत हलाकीची परिस्थिति आहे. येथील गावात रस्ते,नाल्या,अश्या ज्या मुलभुत गरजा आहेत. ते अजुनही पुर्ण झाल्या नाहीत. सुकणेगाव हा संपुर्ण विकासकामा पासुन आज रोजी सुद्धा वंंचित आहे. या गावात विकासचा कामाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून तेथिल जनतेत असंताेषाचे वातावरण पसरल्याचे दिसुन येते.
सुकणेगाव करांना शुद्ध पाणी मिळावे, रस्ते, पथदिवे, स्वच्छ नाल्या, यासाठी स्थानिक पातळीवरचे नेते सुध्दा उदासिन दिसुन येतात. अनेकदा तक्रार करून सुद्धा मुलभुत समस्येकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात आहे. असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
अशा गंभीर समस्येकडे प्रशासन मात्र नेहमीच बघ्याची भूमिका घेत असतांना दिसत आहे .नेमका गावचा वाली कोण ? व कधी समस्या सुटणार असे प्रश्न गावकरी करीत आहे .
विज आणि पाणी तसेच अनेक मुलभुत गरजा देतांना या स्वरुपातील कर आकारणी करून नागरिकांकडुन प्रशासन कर वसुली करत असताे. तेव्हा प्रशासनाचे कर्तव्य असते कि ,नागरिकांना पाहिजे त्या सोई सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजे. सुकणेगाव या गावाचा विकास कधी करतील काही सांगता येत नाही.
जन प्रतिनीधी यांनी निव्वळ आश्वासन देवुन चालणार नाही. तर गावाकडे विकासाचा दृष्टीने कार्य करायला पाहिजे .तसे काही होतांना या गावात गेल्या काही वर्षापासून दिसत नाही आहे.
आता नेमका प्रश्न असा गावकरी करीत आहे की, नेमके प्रशासन झोपी गेला की क़ाय ? जर झोपी गेली असेल तर त्यांनाही उठविन्याचे हे देखील कार्य जनता येत्या दिवसात करेल अशी हाक गावातील जनता देतांना दिसत आहे .
प्रशासन अश्याच प्रकारे हातावर हात धरून बसले आहे .ह्याकडे जन प्रतीनीधीनी लक्ष देने अत्यंत गरजेचे आहे . . . अन्यथा हिच मतदार राजा येत्या निवडणुकीत धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही .आता तरी प्रशासन जागे व्हा !!! येथील नागरिकांची हाक दिसून येते.



