” भीमा विसरु कसे मी तुझे नाव ……….
💐 :- कविता :- 💐
“भीमा विसरु कसे मी तुझे नाव ……….
कवि :- गौतम धोटे
” महाभयंकर जुल्मी रूढीची .
केली तु. होळी मनुग्रंथाची …
भीमा विसरू कसे मी तुझे नांव,
जन कल्याणा झीजलाच नसता
समाज अमुचा सजलाच नसता …
भीमा विसरू कसे मी तुझे नांव,
सिंहापरी तु. गर्जला भुवर बा
मिटविले ईथल्या जातीयतेला बा …
भीमा विसरू कसे मी तुझे नांव,
संविधानाचा भुवर या ताज
पंचशीलेचा चढविला साज …
भीमा विसरू कसे मी तुझे नांव,
ताट माणेन. दिलीच रे तमा
फिरविले धम्मचक्र हे गौतमा…
भीमा विसरू कसे मी तुझे नांव ” 











