कोठरी नाला अरण्यावास बुध्द विहार, येथील संपन्न होणारा वर्षावास समापन सोहळा स्थगित
कोठरी नाला अरण्यावास बुध्द विहार, येथील संपन्न होणारा वर्षावास समापन सोहळा स्थगित
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : दरवर्षी प्रमाणे मौजा कोठरी येथील अरण्यावास बुध्द विहार मध्ये संपन्न होणारा वर्षावास समापन सोहळा कोविड -19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात येत असल्याबाबतचे अध्यक्ष भंते भगीरथ, अरण्यावास बुध्द विहार जंगल परिसर, कोठरी यांनी या कार्यालयास कळविले आहे. त्याअनुषंगाने, दरवर्षीप्रमाणे १७ नोव्हेंबर २०२० रोजी कोठरी येथे संपन्न होणारा वर्षावास समापन सोहळा कोविड -19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्थगित करण्यात आले आहे , असे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,दीपक सिंगला यांनी कळविले आहे.




