वणी पोलिसांनी पकड़ले मोटार साइकल चोर,चार वाहने जप्त
वणी – येथील पोलिसांनी पकड़ले तीन मोटार साइकल चोरटे आणि चार वाहने सुद्धा जप्त करण्यात आले . मनोज तुळशीराम धगडी ,वय ३७ वर्षे धंदा-शेती रा.वेगाव, ता. मारेगाव जी.यवतमाळ यांनी पो.स्टे.वणी येथे ४/११/२०२० रोजी पोलीस स्टेशन वणी येथे येऊन जबानी रिपोर्ट दिला कि, दिनांक ०३/११/२०२० रोजी डोंगरगाव शेतशिवार ता.वणी येथून अज्ञान चोरट्याने त्याच्या मालकीची मो.सा.क्र. MH 34 BA 6966 फॅशन एक्स प्रो.काड्या रंगाची कि.अ. ४०,००० /- हि चोरी केली आहे अश्या रिपोर्ट वरून दिनांक ४/११/२०२० रोजी पो.स्टे.वणी अप.क्र. ९२६/२०२० अ ३७९ भा.दं.वि चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक ४/११/२०२० रोजी सदर गुन्ह्यात चोरीला गेलेली मो.सा MH 34 BA 6966 _फॅशन एक्स प्रो.काड्या रांगांची हि आरोपी चंदन सदन चौधरी वय ४० वर्ष रा.खैरी चकणी ता.समरी जी.बकसार राज्य – उत्तर प्रदेश ह.मु. खरबडा मोहल्ला वणी जी.यवतमाळ हयाने चोरी केली असून त्याने जवळ दोन अधिक चोरीतील मोटार सायकली आहे. अशा खबर वरून खरबडा मोहल्ला वणी येथे जाऊन आरोपी नामे चंदन सदन चौधरी वय ४० वर्ष रा. खैरा चकणी ता.सेमरी जी.बकसार राज्य – उत्तर प्रदेश ह.मु.खरबडा मोहल्ला वणी,जी. यवतमाळ हयाने जवळून सदर गुन्ह्यातील मो.सा.क्र. MH 34 BA 6966 फॅशन एक्स प्रो.काड्या रांगांची व त्याचे घराचे आवारातून दोन मो.सा १) MH 29 1223 हिरो होंडा स्प्लेंडर काड्या रंग निळापटा कि.अ ३०,००० /- चेसीस नं. MBLHA10EE8HJ19837 २) डिस्कवर १२५ सी.सी काड्या रेडपटा कि.अ .३०,००० /- इजीन नं. JEZWCH80835 अशा एकूण ०४ मो.सा जप्त करण्यात आले.
तसेच फिर्यादी संजय रामभाऊ भगत रा.भीमनगर वणी यांनी हिरो कंपनी ची स्प्लेंडर प्लस लाल काड्या रंगाची मो.स.क्र. MH-29 AH-1876 हि आरोग्य विभाग वणी चे गेट बाजूला येऊन चोरीस गेलेली मो.सा. हि नागपूर येथे मिळून आल्याने पो.स्टे.वणी अप.क्र. ७३७/२०२० कलम ३७९ भा.दं.वि मध्ये नागपूर कारागृहातून ट्रान्सफर कार्यवाही करून आरोपी १) मोहम्मद अनिस मोहम्मद रईस वय ३० वर्ष रा.गजानन आता चक्कीजवळ सेघर्ष नगर पो.स्टे.वाठोडा २) सुरज बलवीर सिंग वय १९ वर्ष रा.पार्डी भवानी मंदिर पो.स्टे.पार्डी नागपूर शहर यांचा पो.स्टे.वणी यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कार्यवाही मा.संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि.वैभव जाधव ,डि.बी पथकाचे पोउपनि /गोपाळ जाधव, पोहवा/सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे,रत्नपाल मोहडे, अमित पोयाम, पोकॉ /पॅनकाज उंबरकर, पोकॉ/दिपक वांद्रस्वर यांनी केली.



