राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शाळेची फी न भरण्याचे आदेश कुठेही नाही,फी भरतांना सहानुभूति दाखविणे आवश्यक
वणी – राज्यातील कोरोनाचा साथिची सध्याची परिस्थिती संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशाची उपलब्धता याबाबत विचार घेतले असता ,बोर्डाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते की, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखवावे,असा स्पष्ट आदेश परिपत्रक जाहीर केलेला आहे.
मागील महिन्यात काही पालकांमध्ये शाळेच्या फी संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती आहे. फी जमा करण्यासंदर्भात शाळेतून मिळत असलेल्या मेसेजमुळे पालक संभ्रमात आहे. शाळेकडून फीची थकीत रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे. नवीन सत्राची फी जमा करण्यासाठी अवधी दिला जात आहे. यासंदर्भात, भद्रावती येथील पंचायत समिती विभागातील गट शिक्षण अधिकारी ,सीबीएससी व इंग्रजी माध्यमाचा शाळा संचालक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांचे म्हणणे असे पडले की , “शासन परिपत्रकात स्पष्ट सांगितले की, फी वाढ करू नये व पालकांना फी भरण्यास सवलत द्यावी” तशाच प्रकारे चंद्रपूर शाळा त्या आदेशाचे पालन सुद्धा करत असल्याचे सांगितले जात आहे . महत्वाचे म्हणजे पालकांना भद्रावती भद्रावती येथील संचालकांनी काही प्रमाणात पालकांना फी मध्ये कमतरता सुद्धा केली आहे . अशीही एक प्रकारची सहानुभूति येथील संचालक करत आहे . याबाबत येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा नियमानुसार याला दुजोरा दिलेले आहे. फी घेतल्याशिवाय शाळा आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन सुद्धा कसे देणार ?असा साधारण प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे.
आणि दुसरीकडे पालकांमध्ये याबाबत चर्चा आहे की , फी भरायची नाही .” यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती फटिंग यांनी स्पष्ट केले की, “राज्य सरकारच्या निर्देशानुसार व जीआर मध्ये पालकांनी थकीत फी भरायची नाही “,असा कोणताही उल्लेख नाही. प्रत्येक शाळांना सुद्धा सांगितले की, फी टप्प्या-टप्प्याने घ्या ! असा स्पष्ट परिपत्रक शासनाने दिला आहे .पालकांनी कोणत्याही उलट-सुलट चर्चेकडे लक्ष न देता शासनाच्या परिपत्रकात लक्ष केंद्रित करावे असे येथील संचालक व गटशिक्षणाधिकारी यांनी यांचे म्हणणे आहे .येथील अधिकारी यांनी पालकांना असे सुद्धा म्हटले आहे,” की जर एखादी शाळा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर, त्यावर कारवाई सुद्धा करू ,असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे.



