खैरे कुणबी समाज बांधव राजूरच्या वतिने वणीउपविभागीय अधिकारी मार्फ़त मुख्यमंत्र्याना साकड़े

वणी – मारेगाव तालुक्यातील धामणी येथील ५ वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग केले. या घटनेचा निषेध जन सामान्यातुन व महिला वर्गात दिसून आला. घरी कोणीही नसल्याची संधी साधुन अवघ्या वयाच्या ५ वर्षीय चिमुकलीवर आरोपी बंडू पांडुरंग भड़के वय ४० वर्ष यांनी तिच्यावर जे अवांछनीय कृत्य केले .
त्याच्या निषेध म्हणून दि २.११.२०२० रोजी राजुर येथील खैरे कुणबी समाज बांधवानी वणी येथे निवेदने देऊन त्या बालिकेला न्याय द्यावा व त्या नराधमाचा खटला जलदगतिने कोर्टात चालविन्यात यावे तसेच चिमुकलीला न्याय व प्रशासनाकडुन पीडित कुटुंबास आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणीत राजुर येथील महिला व समाज बांधव यांचा आक्रोश वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत त्यांचा निवेदनातून मुख्यमंत्र्याना साकडे घातले व प्रतिलिपी म्हणून ,गृहमंत्री ,पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन पाठविन्यात आले.