वणी येथे बारा बलुतेदार संघाची बैठक संपन्न
🔴 *वणी विधानसभा क्षेत्रात संघटन उभारणार*
🔴 *गाव तिथे समिती गठीत होणार*
🔴 *सामाजिक, शैक्षणिक, समजाचा विकासात्मक कार्यवर भर देणार*
🔴 *पुढील दिशा 7 नोव्हेंबर 2020 ला ठरेल*
वणी – हजारो वर्षांपासून आपला बाराबलुतेदार बांधव सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी कौटुंबिक जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक स्वनिर्मित वस्तू चा पुरवठा करीत आहे व आजही करीत आहे .
परंतु एकूण लोकसंख्येच्या 18 % ते 19% असलेला समाज असंघटित असून शासन प्रशासन मध्ये आपल्या समूहाला पाहिजे ,तसा समाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक वाटा कुठं मिळतणा दिसत नाही व या बाबत येथील सर्व पक्ष संघटना बारा बलुतेदार समूहाचे बारा महामंडळ स्थापन त्याच्या प्रश्नांची उपापोह करतात .पण त्यावर कुठलाही पर्मनंट सोल्युशन अजून पर्यत केलेलं नाही . तसेच आपले उच्चस्तरीय चालणारे संघटन फक्त आपल्या समाजाच्या समस्या चे निवेदन देण्यापलीकडे कुठलीही बाजू मांडताना दिसत नाही.याला कारण म्हणजे आपला असंघटित पणा,बारा बलुतेदार समाज जर एकत्रित आला, आपले हक्क अधिकार संघटनेचे माध्यमातून शासनाच्या दरबारात प्रशासनाच्या माध्यमातून आपले प्रलंबित प्रश्न सामूहिकरित्या एकत्र येउन लढा देत येईल. त्या करिता बारा बलुतेदार समाजच संघटन महत्वाचं आहे
.
ह्या बैठकीत महत्त्वाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. ह्या बैठकीचे संयोजक प्रवीण खानझोडे राजू तुरणकार तसेच उपस्थितांपैकी प्रदीप मुक्के ,शशिकांत नक्षीने ,रामकृष्ण दुधलकर ,संजय गाताडे,सुनील अक्केवार अजिंक्य शेंडे ,पुरुषोत्तम नवघरे ,बंडू सहारे, सौरभ वानखडे, किसन मोहबिया, हरिष मोहबिया, ध्रुव येरने उपस्थित होते



