टाकळी येथे मनाला सुन्न करणारी घटना
आत्महत्येने मारेगाव कधी मुक्त होईल ?
मारेगाव :- -तालुक्यातील टाकळी येथील विठ्ठल जुमनाके वय ४३ वर्ष असलेल्या इसमाने सायंकाळी ७ वाजता दरम्यान विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. काल सकाळी १० वाजता विठ्ठल जुमनाके व त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला असल्याचे सांगितले जाते.त्या वादावरून विठ्ठल यांच्या मुलींनी विषप्राशन केले,परंतु तात्काळ उपचारासाठी मारेगाव येथे हलविण्यात आल्याने ती बचावली. आपल्या मुलींनेे विषप्राशन केल्या या पश्चातापाने विठ्ठलने विष प्राशन केल्याचे बोलले जात आहे.
विठ्ठल मारेगाव येथून ४ वाजता दरम्यान घरी आला व सायंकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे शेतात गेला. परंतु विठ्ठल घरी न आल्याने रात्री ८ वाजता त्याच्या स्वतः च्या शेता मध्ये गावातल्या नागरिकांनी जाऊन बघितले असता विठ्ठलने आपले जीवन संपविले होते.
वादाचा प्रकार सौम्य असेल तर विष प्राशन करण्याचे कारण मात्र गोंधळून टाकणारे आहे.



