जश्ने ईद मिलादुन्नबी हा सण राजुर येथील गौसिया कमिटीतील मुस्लिम बांधवातर्फे अत्यंत साध्या पद्धतीने व शासनाच्या नियमानुसार केला साजरा
गौसिया कमिटीतील मुस्लिम बांधवातर्फे शासनाच्या नियमानुसार साजरी केली
वणी -तालुक्यातील राजूर येथे गौसिया कमिटीतील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन अत्यंत साध्या पद्धतीने ईद-ए-मिलादुन्नबी हा सण साजरा केला.जश्ने ईद मिलादुन्नबी हा सण मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून मुस्लिम बांधव मोठ्या जल्लोषात साजरा करतात परंतु कोरोनाचा या संकट काळात शासनाने दिलेल्या नियमानुसार राजूर येथील गौसिया कमेटी राजुर मुस्लिम बांधवांनी शासनाचा नियमाची पायमल्ली न करता अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने गौसिया कमिटीद्वारे ध्वज फड़कवून साजरा केला .गावात ही पद्धत खुप वर्षा पासून सुरु आहे.तसेच ,जश्ने ईद मिलादुन्नबी हा सण राजुर गावात खूप मोठ्या उत्साहात जुलूसद्वारे व गावातील लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. परंतु covid-19 प्रादुर्भावाने ही परंपरा कुठेतरी माघार घेऊन अत्यंत शांततेने हा सण साजरा करण्यात आला.येथील गावचे गौसिया कमिटीतील समाज बांधवानी यांनी एकत्र येऊन देशाची कोरोनापासून मुक्ती, बेरोजगारांना काम मिळावे व देशात शांतीचे वातावरण मिळावे अशी प्रार्थना याचातर्फे करण्यात आली. यासाठी येथील लतीफ उद्दीन खान, हाफिज अब्दुल्ला जलील, हाफिज असमत, रिजवान सय्यद, सोहित खान ,फैजल खान, आकिब,आदिनी परिश्रम केले.



